Share Market : मंगळवारी सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल 1,000 हून अधिक अंकांनी घसरला आणि शेअर बाजार(Share Market) धडाधड कोसळला आणि गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटींचे नुकसान झाले. आशियाई बाजारात(Asian Market) तेजीचा कल असूनही, भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) आज मोठी घसरण झाली, ज्यामुळे सेन्सेक्स एक हजार हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला. शेवटी तो 1053.10 अंकांच्या (1.47 टक्के) घसरणीसह 70,370.55 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या(NSE) निफ्टी-50 मध्येही मोठी घसरण झाली. निफ्टी-50 333 अंकांच्या (1.54 टक्के) घसरणीसह 21,238.80 वर बंद झाला. (Sensex falls by over 1,000 points)
एचडीएफसी बँकेच्या(HDFC BANK) शेअर्समध्ये सतत घसरण झाल्यामुळे वित्तीय समभागही(Financial stocks) घसरले तर सोनीने (SONY) झी एंटरटेनमेंटचे( Zee Entertainment )बरोबरचा विलीनीकरणाचा करार (Agreement of Merger) रद्द केल्यानंतर झी एंटरटेनमेंटचे समभाग जवळपास 30 टक्क्यांनी घसरले. या दोन्ही समभागांच्या विक्रीचाही बाजारातील भावावर परिणाम झाला.
तीस समभागांनी बीएसई सेन्सेक्स (BSE SENSEX) आज जोरदार वाढीसह उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात 72 त्याने हजारांची पातळीही पार केली. तथापि, सेन्सेक्सची वाढ जास्त काळ टिकून राहिली नाही. काही काळानंतर तो लाल रंगात आला. शेवटी तो 1053.10 अंकांच्या किंवा 1.47 टक्क्यांच्या घसरणीसह 70,370.55 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक 3.67 टक्क्यांनी वाढले. याशिवाय भारती एअरटेल(Bharti Airtel), आयसीआयसीआय बँक(ICICI Bank), पॉवरग्रिड टीसीएस( Powergrid TCS ) आणि बजाज फिनसर्व्ह( Bajaj Finserv )हिरव्या रंगात राहण्यात यशस्वी झाले.
बँकिंग शेअर्समध्ये मात्र, आज मोठी घसरण झाली. इंडसइंड बँकेचा(IndusInd Bank) समभाग ६.१३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तसेच स्टेट बँक(STATE BANK), एचडीएफसी बँक(HDFC BANK), अॅक्सिस बँक(AXIS BANK), इन्फोसिस(Infosys), रिलायन्ससह(Reliance) 24 कंपन्यांचे समभाग घसरणीने बंद झाले.
काय आहे बाजार घसरण्याचे कारण?
भू-राजकीय चिंता( Geopolitical concerns ), परदेशी गुंतवणूकदारांनी( Foreign investors )केलेली विक्री आणि निर्देशांकात मोठे वजन असलेल्या आघाडीच्या समभागांच्या घसरणीमुळे आज भारतीय समभाग घसरले.
मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये एचडीएफसी बँकेचे शेअर्स बीएसईवर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 4 टक्क्यांनी घसरले. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत 26 ऑक्टोबर 2023 रोजी 1,460.55 रुपयांच्या आधीच्या नीचांकी खाली आली.
आज बँकेचे शेअर्स 3.45 टक्क्यांनी (51.05 रुपये) घसरले आणि प्रति शेअर 1427.60 रुपयांवर बंद झाले. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीतील निराशाजनक आकडेवारी नोंदवल्यानंतर गेल्या एका आठवड्यात HDFC बँकचे मार्केट कॅप 15 टक्क्यांनी घसरले आहे.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केलेल्या (FIIs) मोठ्या प्रमाणात केलेल्या विक्रीमुळे HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 1.9 ट्रिलियनने घसरले आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस एचडीएफसी बँकेत विदेशी संस्थांचा 52.3 टक्के हिस्सा होता.