100 टक्के सुरक्षा आणि उत्तम व्याज देणाऱ्या केंद्र सरकारच्या पाच गुंतवणूक योजना

गुंतवणूक (Investment) करायची म्हटली की आपल्याला मर्यादित योजनांची (Schemes) माहिती असल्याने आपण बँकेच्या (Bank) मुदत ठेवी (FD) अथवा आवर्त ठेवीमध्ये (Recurring Deposite) गुंतवणूक करतो. गुंतवणूक करताना विविध गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. भविष्यातील आपल्या गरजा काय आहेत, निवृत्तीनंतर (Retirement) खर्चासाठी लागणारी रक्कम, मुलांचे उच्च शिक्षण (Higher Education) इत्यादि. काही सरकारी योजनाही (Govt. Schemes) पैश्यांच्या 100 टक्के सुरक्षतेसह (Security) चांगला परतावा (Returns) देतात. अशा पाच सरकारी योजना आणि त्याचे निकष काय आहेत याबद्दल आपण माहिती करून घेऊया.

(Five Central Government Schemes that offer 100 percent security and better interest)

  • राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)– राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेचा मुख्य हेतु हा सेवानिवृत्ती सुखकर करणे हा आहे. केंद्र सरकारने (Central Govt.) या योजनेची सुरुवात 2004 मध्ये केली. सुरुवातील ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच होती. मात्र, 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांसह (Govt. Employee) खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (Private Employee) असतील किंवा स्वयंरोजगार (Self Employed) करणारी व्यक्ति असेल अशा कोणालाही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) प्रशासन आणि नियमन करते. मुळात पीएफआरडीएच्या ((PFRDA) स्थापणेमागचा हेतुच हा होता की, नागरिकांच्या वृद्धावस्थेतील उत्पन्न सुरक्षेला प्रोत्साहन देणं हा होता. पीएफआरडीएचे (PFRDA) मुख्य कार्य म्हणजे  आमचा (नागरिकांचा)  निधी विकसित करणे आणि त्यांचे नियमन करणे तसेच नागरिकांच्या हितांचे संरक्षण करणे हा आहे. NPS मध्ये मिळणारे व्याज हे शेअर बाजाराशी (Share Market) निगडीत आहे. NPS मध्ये गुंतवलेले पैसे चार मालमत्ता वर्गांमध्ये विभागून गुंतवले जातात.  इक्विटी (Equity), सरकारी बाँड्स(Govt. Bonds), कॉर्पोरेट बाँड्स (Corporate Bonds) आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडामध्ये (AIF) गुंतविले जातात. यामध्ये तुम्ही सरासरी 10 ते 12  टक्के परताव्याची (Return) अपेक्षा करू शकता, जो इतर कोणत्याही सरकारी योजनेपेक्षा सर्वाधिक आहे. म्हणूनच तुम्हाला तुमची सेवानिवृत्ती सुरक्षित करायची असेल किंवा तुमच्या लहान मुलासाठी मोठा निधी उभारायचा असेल, तर NPS मध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेत तुम्हाला जवळपास 2,60,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळते, त्यामुळे ही योजना कर लाभांच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे.
  • सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजना ( Sovereign Gold Bond) : सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजना ( Sovereign Gold Bond) ही केंद्र सरकाचीच (Central Govt.)योजना आहे. त्यामुळे 100 टक्के सुरक्षा (Security)  यामध्ये आहे. या योजनेमध्ये आपल्याला केवळ चांगला परतावाच (Returns) मिळणार नाही तर गुंतवणुकीवरील जोखीम देखील मिळेल. सॉवेरन गोल्ड बॉन्ड योजना (SG Bond) 2015 मध्ये सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजनेंतर्गत (Gold Monetization Scheme) सुरू केली. या योजनेची सुरुवात करण्यापासून  या योजनेच्या नियम व अटी(Terms and Conditions), दर (Rate)आणि व्याज(Interest) ठरवणे या सर्व गोष्टी  भारत सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच रीझर्व बँक  (RBI)  ठरवते. ही योजना तुमच्यासाठी एक चांगली गुंतवणूक योजना असू शकते कारण येथे तुम्हाला खूप चांगली वैशिष्ट्ये मिळतात आणि ही योजना RBI द्वारे नियंत्रित केली जात असल्याने सुरक्षिततेची कोणतीही समस्या नाही. आपण बाँड ऑनलाइन (Online) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन घेऊ शकतो. यामध्ये तुम्हाला अडीच टक्के व्याज मिळते, जे दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होते. या बाँड्सची खरेदी केल्यानंतर तुम्हाला एसजीबी प्रमाणपत्र (SGB Certificate) देखील मिळते.  ज्याची खास गोष्ट म्हणजे ते तारण ठेवून कोणत्याही बँकेत कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • पोस्टाची मासिक उत्पन्न योजना (MIS) : पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना हीही गुंतवणुकीसाठी उत्कृष्ठ सरकारी योजना आहे, MIS योजना सर्व वर्गांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये, एकदा पैसे जमा केले की, त्याचे व्याज दर महिन्याला आपल्या खात्यात जमा होत राहते. त्यामुळे ते मासिक उत्पन्नाचे एक उत्कृष्ट स्त्रोत देखील बनू शकते. या योजनेतील व्याज (Interest) हे सरकार दर तीन महिन्यांनी ठरवते.  या योजनेत 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो. यामध्ये  कोणताही टीडीएस कापला जात नाही आणि जर तुम्ही आयकर श्रेणीत येत नसाल तर तुम्हाला व्याजावर (Interest) कोणताही कर (Tax) भरावा लागणार नाही.
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : National Saving Certificate(NSC):  ही योजना पोस्ट ऑफिसच्या (Post Office) सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय खाते उघडू शकतो. जर एखाद्याला 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी NSC खाते उघडायचे असेल तर तो पालकांसह खाते ऑपरेट करू शकतो. या योजनेची मॅच्युरिटी (Maturity) पाच वर्षांची असून त्यात व्याजही खूप चांगले आहे. सध्याच्या योजनेतील व्याज ६.८ टक्के आहे, जे अनेक योजनांपेक्षा खूपच चांगले आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून NSC खाते उघडू शकता.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)–  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी  (PPF)  ही केंद्र सरकारची जोखीम मुक्त असण्यासोबतच करमुक्त गुंतवणूक (Tax free Investment) योजना देखील आहे. ही योजना सरकारने मुळात जे लोक सरकारी पेन्शनच्या कक्षेत येत नाहीत किंवा असंघटित असलेल्या क्षेत्रात काम करतात किंवा असे लोक जे रोजगार भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)  किंवा ईपीएफच्या (EPF) कक्षेत येत नाहीत, अशा लोकांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी निधी उभारण्यास मदत करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून, यातील गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्सच्या (Income Tax) सेक्शन(Section) 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीसाठी दावा करू शकता. ही योजना तुमची सेवानिवृत्ती सुरक्षित करत नाही तर तुमच्यासाठी चांगला निधी तयार करण्यातही मदत करते.
  • राजेंद्र पाटील
  • 7972768366

.

Leave a comment