Domestic Systematic Important Bank : आरबीआयने या तीन बँकांना दिला ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट’ बँकेचा दर्जा

Domestic Systematic Important Bank  : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (RBI)  गव्हर्नर(Governer) शशिकांत दास(Shashikant Das)  यांनी नुकतेच एक मोठे स्टेटमेंट (Statement) केले आहे.  हे स्टेटमेंट देशातील महत्त्वाच्या अग्रगण्य असलेल्या तीन बँकांच्या बाबतीत त्यांनी केले आहे.  “स्टेट बँक ऑफ इंडिया’(State Bank Of India) , ‘एचडीएफसी बँक’(HDFC Bank)  आणि ‘आयसीआयसीआय’ बँक (ICICI Bank)  या आपल्या देशातील सर्वात बलाढ्य बँका असून त्यांची स्थिती एवढी उत्तम आहे की त्या कोसळणे केवळ अशक्य आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. या तीन बँकांना आरबीआयने ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँके’चा (Domestic Systematic Important Bank  ) दर्जा दिला आहे. डीएसआयबी (DSIB) असे म्हणण्यात आले आहे.

‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक’(Domestic Systematic Important Bank  ) म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे.  त्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. या तीन बँकांना आरबीआयने (RBI) ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँके’चा दर्जा का दिला?  या मागचे कारण त्यामध्ये दडलेले आहे.

 स्टॉक मार्केटच्या  दृष्टीने जेव्हा चर्चा होते तेव्हा 2008 साली फायनान्शियल क्रायसिस (Financial Crisis) निर्माण झाला होता. त्यावरून सेंट्रल बँकांना (Central bank)  धडा (Lession)  मिळाला की अशा प्रकारची अचानक परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादी मोठी बँक बुडाली तर देशाची  संपूर्ण अर्थव्यवस्थाच डळमळीत होते. त्यामुळे याबाबतीत काही ना काहीतरी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर अनेक नियम आणि  कायदे बनविले गेले. त्यानंतर विविध बँकांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार ॲग्रीगेट करण्यात आले. भारताची सेंट्रल बँक आरबीआय  आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने वरील तीन बँकांची निवड करून त्यांना ‘सिस्टिमॅटिक इम्पॉर्टंट बँके’चा (Domestic Systematic Important Bank) दर्जा दिला आहे.

थोडक्यात या बँकांना सरकारचे पूर्णपणे अभय असणार आहे. म्हणजे या बँकांमध्ये यदाकदाचित काही गडबड झाली तरीही आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडू शकते.  परंतु, सरकारने दिलेल्या या विशेष दर्जामुळे या बँकांच्या मागे सरकार उभे असणार आहे. म्हणजे,  समजा यापैकी कुठल्याही बँकेत काही गडबड झाली तर या बँकेच्या पाठीमागे सरकार उभे राहणार आहे. मग त्यासाठी सरकारला या बँकांमध्ये कितीही पैसे टाकावे लागले तरी ते सरकार टाकेल अशा प्रकारची सुरक्षितता यामुळे निर्माण झाली आहे. त्याला कारण जर या  बँकांमध्ये काही गडबड झाली तर त्याचा पूर्णपणे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

आरबीआयने(RBI) म्हटले आहे की काहीही झाले तरी आम्ही या तीन बँकांना काही होऊ देणार नाही. म्हणून आपण असे म्हणू शकतो की आपला पैसा या तीन बँकांमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. उद्या समजा हॅकर्सने (Hackers) या तिन्ही बँकांपैकी एखाद्या बँकच्या बाबतीत काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप होऊ शकतो, त्याला कारण ही देशाच्या विरुद्ध केलेली कृती असेल. 

Leave a comment