#Share Market: सेन्सेक्समध्ये 1,000 हून अधिक अंकांनी घसरण : गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटींचे नुकसान: या कारणांमुळे कोसळला शेअर बाजार

Sensex falls by over 1,000 points

Share Market : मंगळवारी सेन्सेक्समध्ये (Sensex)  तब्बल 1,000 हून अधिक अंकांनी घसरला आणि शेअर बाजार(Share Market) धडाधड कोसळला आणि गुंतवणूकदारांचे …

Read more

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी(SIP)

Mutual Funds Sahi Hain..

जागतिक गुंतवणूक गुरू(Global Investment Guru) वॉरेन बफे( warren buffett) यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी(Fixed …

Read more

Sensex ने पहिल्यांदाच केला ७३ हजारांचा टप्पा पार : निफ्टीने 22,000 अंकांची पातळी ओलांडली

Sensex crossed the 73 thousand mark for the first time ​

Share Market | Sensex reached a level above 73 thousand : सोमवारी शेअर मार्केटमध्ये (Stock Market ) उच्चतम तेजी आढळून …

Read more

Domestic Systematic Important Bank : आरबीआयने या तीन बँकांना दिला ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट’ बँकेचा दर्जा

RBI has given the status of Domestic Systemically Important Bank to these three banks

Domestic Systematic Important Bank  : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (RBI)  गव्हर्नर(Governer) शशिकांत दास(Shashikant Das)  यांनी नुकतेच एक मोठे स्टेटमेंट (Statement) …

Read more

Disappointment of PPF subscribers : पीपीएफच्या वर्गणीदारांची निराशा : सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर

Disappointment of PPF subscribers

Disappointment of PPF subscribers : केंद्र सरकारकडून (Central Govt.) सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samruddhi Scheme), पीपीएफ(PPF) सारख्या योजना तसेच अल्पबचत (Small …

Read more

Top Mutual Fund 2024 : 30 टक्क्यापर्यंत रिटर्न्स देणारे टॉप म्युचुअल फंड 2024

Top Mutual Fund 2024

Top Mutual Fund 2024 : 2023 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नवीन सुरू होणाऱ्या 2024 या नवीन …

Read more

100 टक्के सुरक्षा आणि उत्तम व्याज देणाऱ्या केंद्र सरकारच्या पाच गुंतवणूक योजना

Five Central Government Schemes that offer 100 percent security and better interest

गुंतवणूक (Investment) करायची म्हटली की आपल्याला मर्यादित योजनांची (Schemes) माहिती असल्याने आपण बँकेच्या (Bank) मुदत ठेवी (FD) अथवा आवर्त ठेवीमध्ये …

Read more

पैसेच पुरत नाही बचत कशी करणार?

How To Start Saving

How to start saving : माझे उत्पन्नच (Earning) इतके कमी आहे की मी बचत(Saving) करूच शकत नाही, मी बचत का करू? पैशाला (Money)  पंख असतात,  कोणाला माहिती की मी उद्या जगेल किंवा मरेल? लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे म्हणून आपण आजच मजा करून घ्या, भविष्याची (Future) चिंता कशाला करायची?, तुम्ही काहीही करा, तुम्ही जास्त काळ पैसे ठेवू शकत नाही, पैसा म्हणजे नशीब, असे बचतीबाबतचे अनेक विचार किंवा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात.

हे सर्व बोलताना याबाबतचा वरवरचा विचार असतो. खरंतर बचत (Saving) करणे हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून नसतेच तर खर्च(Expenditure)तुमच्या उत्पन्नावर (Earning) अवलंबून असतो. तुम्ही म्हणाल काय सांगता ते तुम्हाला तरी कळतं का? पण हो, हे बरोबरच आहे.

म्हणजे तुम्ही 1000 रुपये कमावले काय किंवा 1,00,000 रुपये कमावले काय तुमची विचार करण्याची पद्धत वरती म्हटल्याप्रमाणे असेल तर तुमची बचत जास्त असू शकत नाही, खर्च मात्र अधिक असेल. कारण तुम्हाला तुमच्या मेहनतीची समृद्धता अनुभवायची आहे. श्रीमंत लोक जे-जे करतात, तेते तुम्हाला सर्व काही करायचे आहे. मग तुमच्या ‘स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग’मध्ये (Standard Of Living) आपोआपच रामायणातील (Ramayan) सुरासा (Surasa) राक्षसणीच्या मुखाप्रमाणे वाढ होणार.

तुम्ही सार्वजनिक वाहतूक (Public Transport)  वापरण्यापेक्षा तुम्ही दुचाकी (Two Wheeler) किंवा चारचाकी (Four Wheeler) वाहन खरेदी कराल,  घरगुती खाण्यापेक्षा तुमच्या हॉटेलींगमध्ये (Hotelling)वाढ होणार, स्थानिक दुकानांमध्ये जाण्यापेक्षा  आठवड्यातून किमान एकदा मॉलमध्ये (Mall) जाल, विशिष्ठ चित्रपट (Film) विनामूल्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platform )उपलब्ध होण्याची काही दिवस वाट न बघता चित्रपटगृहांमध्ये (Cinema Theature) बहुतेक चित्रपटांचे ‘फर्स्ट-डे फर्स्ट शो’ (First Day, First Show) बघाल, भाड्याचे घर वापरण्याऐवजी पॉश एरियाजवळ मोठे घर (Big  Home)  खरेदी कराल, जगाच्या तुलनेत सारख्याच असलेल्या जवळपासच्या ठिकाणांना भेट देण्यापेक्षा जगातील सर्व संभाव्य ठिकाणी सुट्टीतील सहलीला तुम्ही जाल. या सर्व गोष्टींच्या ‘शो-ऑफ’ने तुम्हाला तुम्ही श्रीमंत झाल्याचा फील येणार.

परंतु, पैसा किंवा आनंदाच्या बाबतीत खरोखर तुम्ही श्रीमंत (Rich) झाला आहात का? कदाचित तुमच्या आवडीमुळे तुम्हाला श्रीमंत किंवा आनंदी वाटत असेल. कारण, तुमचे नातेवाईक, मित्र, सहकारी किंवा तुम्ही ज्यांची प्रशंसा करत नाही किंवा तुमचे कौतुक होत नाही अशा लोकांकडून तुम्ही काढलेल्या आणि शेअर केलेल्या वरील सर्व गोष्टींची छायाचित्रे आणि विडिओच्या प्रशंसेने तुम्ही भारावून जाल.

पण, तुमच्या हे लक्षात येत नाही की, मोठ्या कामासाठी वापरता येणार्‍या पैशाचा त्याग करून तुम्ही ही तात्पुरती श्रीमंती मिळवली आहे. उदाहरणार्थ, निवृत्ती नियोजनावरील खर्च (Expenditure on retirement planning ), मेडिकल इमरजन्सी (Medical emergency) , अनपेक्षित आकस्मिक खर्च(Contingent expenses), तुमच्या मुलांचे उच्च शिक्षण(Child Higher Education) इ. आणि शेवटचे पण अत्यंत महत्वाचे म्हणजे उत्पन्नाचे किंवा मालमत्तेचे अनेक स्त्रोत तयार करून हळूहळू तुमच्या राहणीमानात सुधारणा करणे.

आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की, श्रीमंत लोक मालमत्ता (Assets) तयार करतात आणि त्या मालमत्तेद्वारे मिळालेल्या नफ्यातून (Profit) वरील सर्व गोष्टी करतात. त्यासाठी आपल्याला तात्पुरती श्रीमंती अनुभवण्यासाठी पगार (Salary) खर्च करण्यापेक्षा माझ्याकडे मालमत्ता (Assets) करण्यासाठी पैसे कसे असतील? याचा विचार करावा लागेल.  

सर्वात पहिली गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की बचत करणे ही एक सवय आहे. जसे की दररोज वर्तमानपत्र वाचण्यासाठी, तुम्हाला त्याचा सराव करणे आवश्यक आहे. म्हणजे रोज वर्तमान पत्र घेणे आणि पहिल्या पानावरील सर्व मथळे (Heading) वाचणे मग इतर पानांवरील मथळे वाचणे, दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावरील बातम्या(News) किंवा त्या पुढील पानावरील लेख(Articles) इत्यादी. सांगायचे तात्पर्य हे की, कधी कधी वर्तमानपत्र वाचायला चुकेलही पण तुम्हाला तुमच्या मनाला पुन्हा वाचण्याचा आदेश द्यावा लागेल. काही दिवसांनंतर, आठवडे, महिने किंवा वर्षांनंतर तुम्ही जर वर्तमानपत्र वाचले नाही तर अस्वस्थ व्हाल, कारण त्याची तुम्हाला सवय झालेली असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला बचतीची सवय लागण्यासाठी बचत करण्याची कला शिकावी लागेल.

मग त्यासाठी काय करावे लागेल? तर आपल्या मासिक पगारातून तुम्हाला बचत करण्यासाठी उत्पन्नातील  ठराविक टक्के रक्कम बाजूला काढावी लागेल. ती बाजूला काढल्यानंतर उर्वरित रकमेतून खर्चाचा विचार करा. प्रत्यक्षात असे होत नाही.  आपल्यापैकी बहुतेकांकडे आपल्या आगामी खर्चाचे मोठे नियोजन असते आणि त्यातून काही उरल्यास आपण बचतीचा विचार करतो अथवा करतही नाही.  

आपण आपल्या वाईट सवयी सुधारल्या पाहिजेत. तुमच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करा, काहीही वाया घालवू नका, आणि आपल्या घरगुती खर्चाचे योग्य व्यवस्थापन करा. पण हे व्यवस्थापन कसे करणार? आम्हाला आमचा सहा महिन्यांचा खर्च लक्षात राहात नाही. तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुमच्या आजोबांची फाटलेली डायरी आठवावी लागेल ज्यामध्ये ते सर्व खर्च लिहीत असत. अगदी दररोज बाजारातून आल्यानंतर चॉकलेटसाठी 5 रुपये, चहासाठी 10 रुपये आणि भाजीसाठी 20 सारख्या छोट्या खर्चाची नोंद डायरीमध्ये करून ठेवा. इथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यामुळे तुमचा जो अतिरिक्त खर्च होतो, ज्याचा तुम्ही कधीच विचार करू शकत नाही आणि तो कसा टाळता येईल याबाबत नियोजन करता येईल.