About

अर्थमंत्र | Arthmantra

चला अर्थसाक्षर होऊ या..

10 लाख मराठी बांधवांना ‘अर्थसाक्षर’ करण्याचे उद्दिष्ट..

म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, इन्शुरन्स, याबद्दल अनेकांना अगदी बेसिक गोष्टींपासून काहीच माहिती नसते. काही जणांना माहिती असते, ती अर्धवट असते. अशांसाठी आमच्या ‘अर्थमंत्र’ (www.arthmantra.org.in ) या वेब साईटच्या  माध्यमातून या बाबतीतल्या संकल्पना, माहिती, विविध योजना, या क्षेत्रात घडणाऱ्या दैनदीन घडामोडी, यांची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बचतीचे महत्व, बचत कशी करायची?, याशिवाय गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु, नक्की कुठे गुंतवणूक करावी, कशी करावी, नक्की फायदेशीर काय आहे? अथवा विविध गुंतवणुकीच्या माध्यमातून आपले ‘फायनान्शियल प्लॅनिंग’ कसे करावे? याबाबत गोंधळ असतो. त्या संदर्भात या ‘अर्थमंत्र’द्वारे  (www.arthmantra.org.in ) मार्गदर्शन केले जाईल.

आरोग्यविमा सारख्या विषयात तर ग्राहक म्हणून अनेक गोष्टी माहिती नसतात. बऱ्याच वेळा त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. याबाबत आणि सर्व प्रकारच्या इन्शुरन्सबाबत आम्ही माहिती आणि मार्गदर्शन करणार आहोत.

याशिवाय बँकिंग क्षेत्र, विविध बँकांच्या योजना, पोस्ट, केंद्र आणि राज्य सरकारच्या गुंतवणुकीच्या योजना, सोन्यातील गुंतवणूक, ‘रिअल इस्टेट’, बॉन्डस्, डीबेंचर्स अशा विविध गुंतवणुकीच्या मध्यमांबद्दल माहिती आणि मार्गदर्शन या अर्थमंत्र या आमच्या वेब साईटच्या (www.arthmantra.org.in) माध्यमातून केले जाईल. ‘अर्थमंत्र’च्या वेब साईट (www.arthmantra.org.in) आणि यूट्यूब चॅनेलच्या (https://www.youtube.com/channel/UCWD_C4Euy8jAGNulg3idIoA)  माध्यमातून 10 लाख मराठी बांधवांना ‘अर्थसाक्षर’ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Prayeja Puram Flat No. 1103 11th Floor Vadgaon Bk Sinhagad Road Pune-411041

Web Site:- www.arthmantra.org.in

Email:- raajendrra@gmail.com

Facebook:- https://www.facebook.com/profile.php?id=61554667314776

Instagram:- https://www.instagram.com/arth_mantra/

YouTube:- https://www.youtube.com/channel/UCWD_C4Euy8jAGNulg3idIoA