Additional 50% tariff imposed by US on India likely to come down to 10-15% : भारत (India) आणि अमेरिका (America) यांच्यातील ताणलेले व्यापार संबंध आता सुधारण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) नागेश्वरन (Nageswaran) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेले अतिरिक्त टॅरिफ (Tariff) (आयात शुल्क) लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतावर एकूण ५०% टॅरिफ (50% Tariff) लावले जात आहे, ज्यात २५% रशियन तेलाशी (25% Russian Oil) संबंधित आणि २५% रेसिप्रोकल टॅरिफचा (25% Reciprocal Tariff) समावेश आहे. नव्या धोरणानुसार, पहिला २५% टॅरिफ (25% Tariff) पूर्णपणे काढून टाकला जाऊ शकतो आणि दुसरा २५% टॅरिफ (25% Tariff) १० ते १५ (10-15) टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. याचाच अर्थ, एकूण ५०% टॅरिफ (50% Tariff) थेट १०-१५% (10-15%) पर्यंत खाली येऊ शकतो. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे ८ ते १० आठवड्यांचा (8 to 10 weeks) कालावधी लागण्याची शक्यता आहे. अर्थात, अमेरिका हे विनाकारण करणार नाही; या बदल्यात भारताला अमेरिकेकडून संरक्षण सामग्री (Defense Material) खरेदी करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी २-३ महिने (2-3 months) भारतीय बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.







