Disappointment of PPF subscribers : केंद्र सरकारकडून (Central Govt.) सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samruddhi Scheme), पीपीएफ(PPF) सारख्या योजना तसेच अल्पबचत (Small Saving) आणि मुदत ठेवी (Fix Deposite) यांच्यावरील व्याजाचा(Interest) तिमाही आढावा घेऊन दर तिमाहीच्या अंती पुढील तीन महिन्यासाठीचे व्याजदर जाहीर केले जातात. शुक्रवारी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालायच्या (Finance Ministry) वतीने जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी व्याजदर जाहीर करण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून व्याजदर वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (ppf) वर्गणीदारांची निराशा केली आहे. त्याचवेळी सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात थोडी वाढ करीत गुंतवणूकदारांना (Investors) आनंदाची बातमी दिली आहे.
अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा सरकारकडून आढावा घेतला जातो. त्यानुसार पुढील तिमाहीसाठी व्याजदर निश्चित केले जातात. 31 डिसेंबरला ही दर जाहीर केले जातात. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी व्याजदर जाहीर करण्यात आले.
पीपीएफच्या (PPF) वर्गणीदारांना सध्या 7.1 टक्के व्याजदर (Interest Rate) लागू आहेत. गेल्या एप्रिल 2020 पासून या व्याजदरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. काही दिवसांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका (Loksabha Election) होणार असल्याने सरकारकडून पीपीएफच्या वर्गनिदारांना व्याजदर वाढीची भेट दिली जाईल असा कयास विश्लेषकांनी (Analyst) व्यक्त केला होता. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 10 वर्षे मुदतीच्या रोख्यांवरील परतावा 7.28 टक्के नोंदवला गेला. त्यामुळे त्याआधारे पीपीएफवर 7.53 टक्के व्याजदर मिळण्याच्या अपेक्षा होत्या. मात्र, व्याजदरात कुठलीही वाढ न झाल्याने पीपीएफच्या वर्गणीदारांची निराशा झाली आहे.
त्याचवेळी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्ष असलेल्या मुदत ठेवीच्या काही छोट्या बचत योजनेचे व्याजदर वाढवले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर सध्या 8 टक्के होते. त्यामध्ये 0.20 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा व्याजदर 8.2% इतका झाला आहे. याबरोबरच तीन वर्षाच्या मुदत ठेवीसाठीचा व्याजदर वाढवून तो 7.1% करण्यात आला आहे.