Top Mutual Fund 2024 : 30 टक्क्यापर्यंत रिटर्न्स देणारे टॉप म्युचुअल फंड 2024

Top Mutual Fund 2024 : 2023 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नवीन सुरू होणाऱ्या 2024 या नवीन वर्षात गुंतवणुकीचा संकल्प (Investment resolution) आपण केला असेल तर आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून काही मार्गदर्शनपर (Guide Lines) टिप्स (Tips) देत आहोत.

गुंतवणूक (Investment) करायची म्हटलं की मनात पहिला प्रश्न येतो तो, कुठे गुंतवणूक करू?  मग आपण ऐकलेले असते किंवा आपल्याला सल्ला दिला जातो की म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Fund)  SIP सुरू करा. मग पुढचा प्रश्न निर्माण होतो. SIP कशी सुरू करायची? आणि कुठल्या फंडात गुंतवणूक करायची? त्यासाठी 2024 या नवीन वर्षात टॉप म्युच्युअल फंडांची आपण माहिती करून घेऊयात, जे स्मॉल कॅप (Small Cap) कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

बऱ्याचवेळा गुंतवणूकदार स्मॉल कॅप कंपनीमध्ये (Small Cap Companies) गुंतवणूक (Investment) करण्याचे टाळतात. पैसे गुंतवायचे असतील तर गुंतवणूकदारांचा ओढा हा मोठमोठ्या कंपन्यांकडे असतो.परंतु, आपण बारकाईने अभ्यास केला आणि इतिहास बघितला तर ‘स्मॉल कॅप’ म्युच्युअल फंडांनी(Small Cap Mutual Fund)  ‘लार्ज कॅप’ फंडांपेक्षा (Large Cap Mutual Fund ) उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. अर्थात चांगला परतावा(Returns) दिला आहे.

‘स्मॉ’ल कॅप फंडस्’च्या (Small cap funds) माध्यमातून छोट्या मात्र, भविष्यात मोठ्या होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती लगेचच वाढायला लागतात आणि आपल्याला त्यातून चांगला परतावा मिळतो. ‘स्मॉल कॅप फंड’ असे म्युच्युअल फंडस् आहेत की जे, आपल्या ऍसेट(Assets) पैकी 65 टक्के स्मॉल कॅप कंपनीच्या इक्विटीमध्ये(Equity) गुंतवतात आणि बाकीचे 35 टक्के लार्ज किंवा मिडकॅप (Midcap) कंपन्यांच्या इक्विटीमध्ये गुंतवतात. ‘मिंट’ (Mint) या कंपनीने दिलेल्या एका अहवालानुसार ‘स्मॉल कॅप फंडां’नी ला’र्ज कॅप फंडां’च्या तुलनेत चांगली कामगिरी केलेली आहे. ((मिंट (Mint) हे एक भारतीय व्यावसायिक आणि आर्थिक दैनिक वृत्तपत्र आहे जे HT Media द्वारे प्रकाशित केले जाते)

आपण जेव्हा ‘स्मॉल कॅप म्युच्युअल फंडा’ (Small Mutual Funds) ऐवजी एक किंवा दोन स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Shares) गुंतवणूक करतो तेव्हा आपल्या पैशाची जोखीम (Risk) ही जास्त असते. अर्थात त्यामध्ये सुरक्षितता (Security) कमी असते. त्यामुळे पैसे बुडण्याचा धोका (Risk) असतो. परंतु,  जर हीच गुंतवणूक ‘स्मॉल कॅप म्युच्युअल फंडा’मध्ये केली तर धोका कमी असतो. कारण आपण जी गुंतवणूक करतो, ती केवळ एका ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. त्यामुळे यदाकदाचित जर एखादी कंपनी बुडाली तरी फारसा फरक पडत नाही आणि तुमचे पैसे बुडण्याचा धोका अगदी कमी असतो.

2024 मध्ये टॉप स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांच्या बाबतीत माहिती करून घेऊयात.

पहिला म्युच्यअल फंड आहे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड(Nippon India Mutual Fund). आपण जर बघितलं तर मागील दहा वर्षांमध्ये या फंडाने सरासरी 29.24 टक्के परतावा(Returns) दिला आहे. दुसरा म्युच्यअल फंड आहे, SBI म्युचुअल फंड (sbi Mutual Fund). या फंडानेही गेल्या दहा वर्षांत 28.34 टक्के परतावा(Returns) दिला आहे. तिसरा फंड आहे DSP म्युचुअल फंड (DSP Mutual Fund). या फंडाने मागील दहा वर्षांत 25.95 टक्के परतावा दिला आहे. चौथा फंड आहे ॲक्सिस म्युच्युअल फंड(Axis Mutual Fund) या फंडाने गेल्या दहा वर्षात 25.15 टक्के परतावा दिला आहे. पाचवा चांगला पर्याय आहे कोटक महिंद्रा म्युचल फंडाचा( Kotak Mahindra Mutual Fund),  ज्याने गेल्या 10 वर्षांत 24.40 टक्के परतावा दिला आहे. या यादीत आणखी एका म्युच्युअल फंडाचा समावेश करावा  लागेल तो म्हणजे एचडीएफसी म्युच्युअल फंड (HDFC Mutual Fund).  ज्याने गेल्या दहा वर्षात 22.54 टक्के परतावा दिला आहे. त्यानंतर आपल्याला सुंदरम म्युच्युअल फंडाचाही (Sundaram Mutual Fund)  विचार करता येईल या फंडाने गेल्या दहा वर्षात 22.52 टक्के  परतावा दिला आहे. या यादीत आणखी एका म्युच्युअल  फंडाचा समावेश करायचा म्हटलं तर क्वांट म्युच्युअल फंडाचा(Quant Mutual Fund) करता येईल. या फंडाने गेल्या दहा वर्षांत सरासरी 19.17 टक्के  परतावा दिला आहे.

ज्यावेळी आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो त्यावेळी आपण आपले पैसे एका तज्ञ व्यक्तीच्या हातामध्ये दिलेले असतात या तज्ञ व्यक्तीला फंड मॅनेजर असे म्हणतात. तो फंड मॅनेजर संपूर्ण  रिसर्च करतो. त्यानंतर तो गुंतवणूकदारांचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतविले जातात. त्यामुळे धोका कमी असतो.

शेवटी असे म्हणता येईल की ‘स्मॉल कॅप’ फंडामध्ये (Small Cap Funds) गुंतवणूक करणे अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे लोक दीर्घ काळानंतर चांगला परतावा (Returns) मिळण्यासाठी कमी कालावधीची असलेली जोखीम (Risk) किंवा किमतीतील चढउतार किंवा अस्थिरता (volatility) सहन करू शकतात.

(टीप – या लेखातील माहिती ही केवळ मार्गदर्शनपर दिलेली आहे. वाचकांना कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

Leave a comment